जगातील ही नदी पाहून व्हाल थक्क पहा हा व्हिडिओ | Wonderful Rivers | लोकमत न्यूज़

2021-09-13 2

आपल्या देशात एक अशीही नदी आहे जी आपल्या अपेक्षेपेक्षाही अधिक स्वच्छ आहे. ही नदी इतकी स्वच्छ आहे की पाण्याखालचा दगड अगदी लखलखीत चमकतो. त्यात कचऱ्याचा एकही कण आपल्याला सापडणार नाही. ही देशातली सगळ्यात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच नाव आहे उम्नघाट नदी. मेघालयची राजधानी शिलांगच्या 95 किलोमीटर लांब डावकी या शहराच्यालगत ही नदी वाहते. डावकी शहर हे बांगलादेशाच्या सीमेवर वसलेलं आहे.अनेकांना तर विश्वासच होत नाही की, आपल्या देशात अशी स्वच्छ आणि सुंदर नदी असू शकते. या नदीतून प्रवास करताना जाणवतं की, जसं आपण एखाद्या काचेच्या पारदर्शी तुकड्यावर तरंगत आहोत. या नदीप्रवाहातील खडकं, वाळू, पाण्याखालील जीवसृष्टी, इत्यादी घटक आपल्या स्पष्टपणे पाहता येतात.जे-जे लोक या नदीला भेट देतात, त्यांना असचं वाटत कीं ते वेगळ्याच जगात फिरुन आले आहेत. या नदीचं सुंदर रुप, खळखळ वाहणारं पाणी आणि त्या नदीतला खरेपणा अगदी मनाला स्पर्श करतो. काहींनी तर या नदीला स्वर्गाची उपमा दिली आहे. या नदीच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या प्रत्येकाला असच वाटत की आयुष्यात एकदातरी उम्नघाट नदीला भेट द्यावी.
बांगलादेश आणि भारताच्या मधून ही नदी वाहते. या नदी खाली गोल गोल दगडांची सुंदर नक्षी आपल्याला पहायला मिळते. ही नदी पुर्वीपासूनच इतकी स्वच्छ आहे.हिवाळ्यात तर ही नदी आणखी सुंदर आणि स्वच्छ पहायला मिळते. इथं येणाऱ्या प्रत्येकाला सक्ती आहे की, कोणीही नदीत आणि आजूबाजूला कचरा करणार नाही. स्थानिक रहिवासीही या नियमाचं काटेकोरपणे पालन करतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires